प्रहार जनशक्ती पक्ष लोकभावनेचा विचार करुन संधी देणारा पक्ष : नामदार बच्चू कडू
अकोल्यात जळगाव युवा सेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह अनेकांचा प्रहार पक्षात प्रवेश
अकोला : अकोला येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने जळगाव युवा सेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील तसेच युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.
लोकभावनेचा विचा करून संधी देणारा पक्ष
यावेळी बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच लोकभावनेचा विचार करुन संधी देणारा पक्ष आहे. आज झालेल्या पक्ष प्रवेशामुळे रावेरज्-यावल तालुक्यात पुन्हा नव्याने उभारी घेण्याचे काम आपण एकत्र मिळून करू. याप्रसंगी बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील व सर्व अकोला शहराचे पदाधिकारी उपस्थित होते..



यांचा प्रहार पक्षात प्रवेश
तामसवाडी सरपंच नरेंद्र कोळी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शिवसेना शेख लतीफ, युवा सेना शहरप्रमुख रावेर मनोज वरणकर, शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण चौधरी, उपशाखाप्रमुख गौरव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शाखाप्रमुख विशाल पाटील, भूषण धनके, राजेंद्र पाटील, लीलाधर राजपूत, जीवन जाधव, जय राजपूत, भगवान कोळी निंबोल व इतर कार्यकर्त्यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला.

