वरणगाव शहरातील समांतर महामार्गाचे काम सुरू करा


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी

वरणगाव : फुलगाव फाट्यापासून वरणगाव बसस्थानक चौक ते साईबाबा मंदिर दरम्यान दुभाजक टाकुन बसस्थानक चौकात भव्य सर्कल उभारून शिवाजी नगर, बसस्थानक, पोलीस स्टेशन, सदानंद टॉकीज जवळील सातमोर्‍या जवळील पूल मंजूर करा व तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर ते आयुध निर्माणी पर्यंतचा दुभाजक टाकून रस्त्याचे काम व फुलगांव फाटा ते साईबाबा मंदिर दरम्यान समांतर महामार्गाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन डकरी यांच्याकडे बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ।राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केली आहे. निवेदनाची प्रत माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा र् खडसे, आमदार संजय सावकारे यांना देण्यात आल्या आहेत.

तर गैरसोय होणार दूर
नवीन बायपासचे काम पूर्ण झाल्याने अस्तित्वात असलेल्या महामार्गावरून वाहतूक बंद झाल्याने व्यापारी व नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात परिणाम झालेला आहे तसेच वरणगांव बसस्थानक चौकातून बोदवड तालुक्यात जाण्यासाठी तसेच 28 खेडे लागून असल्याने बाजारपेठ वरणगांव शहरात असल्याचे यावेळी गडकरी यांना सांगण्यात आले. यावेळी भाजपाचे शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, भाजयुमोचे शहर सरचिटणीस आकाश निमकर उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !