बोदवड नगरपंचायतीतील तीन नगरसेवकांना तीन अपत्ये ?
शहरात रंगताय खुमासदार चर्चा : विरोधकांनी पाळली चुप्पी
बोदवड : ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत होऊन तीन वर्षे पूर्ण झाले असून 17 प्रभागातून 17 नगरसेवक निवडून आले असलेतरी निवडून आलेल्या तीन नगरसेवकांना तिसरे अपत्य असतांना सुध्दा ते आजही त्या पदावर कायम असल्याची चर्चा आहे. शासनाची फसवणूक करणारे ते नगरसेवक कोण? याबाबत शहर तथा तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे .हा मनमानी कारभार सुरू असतांना विरोधकांनी सुध्दा हाताची घडी तोंडावर बोट अशी भुमिका घेतली असल्याने बोललं जात आहे. निवडून आलेल्या 17 नगरसेवकांपैकी तीन नगरसेवकांनी सखोल चौकशी केल्यावर दुध का दुध और पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही तसेच त्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई झाल्यावाचून राहणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. काही लोकप्रतिनिधींनी नामनिर्देशनपत्र भरतेवेळी याबाबतची माहिती लपवून ठेवली असून कागदोपत्री दत्तक पत्रक तयार करून आपल्याला दोनचं अपत्य असल्याचं दाखवून शासनाची फसवणूक केली असल्याच्या चर्चा बोदवड शहरात सर्वत्र सुरू आहे.
तर होवू शकते नगरसेवकांवर कारवाई
एखादे मूल दत्तक देण्यास हिंदू दत्तक व देखभाल कायद्यान्वये परवानगी देण्यात आली आहे मात्र या कायद्याचा आधारही पंचायत राज कायद्यातील तरतुदींना नाही त्यामुळे दत्तक पत्र सादर करणार्या या त्रिकुट नगरसेवकांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.