माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी कायम : ईडीचे पुन्हा समन्स


मुंबई : शंभर कोटींच्या लाच मागणीप्रकरणानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असतानाच पुन्हा ईडीने त्यांना समन्स बजावले आहेत. देशमुख यांना सोमवारी 2 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास बजावण्यात आले असून देशमुख यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांना देखील समन्स बजावण्यात आलं असून त्यांनाही ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल देशमुखांच्या घरी छापे मारले होते. यानंतर ईडीने त्यांना 4 समन्स पाठविले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. तसेच वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत मंगळवारी अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार देत त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. अनिल देशमुख यांच्या वकीलांनी ईडीकडे 8 दिवसांची मुदत मागितली होती.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !