माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन


सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेतेूमाजी आमदार भाई गणपतराव देशमुख (94) यांची शुक्रवारी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर 16 जुलैपासुन सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्या प्रकृतीत अनेकवेळा चढ-उतार सुरू होता काही वेळेस त्यांची प्रकृती चिंताजनकही बनली होती. अकरा वेळेस विधानसभा जिंकल्यामुळे वर्ल्ड गिनीज बुकमध्ये आबांच्या कारकिर्दीची नोंद झाली आहे. गणपतराव देशमुख (आबा) हे बहुतांशी काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले, तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा ते मंत्रिमंडळात मंत्री होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !