15 ऑक्टोबर नंतर बंद होणार हतनूरच्या उजव्यातट कालव्यातील पुर्नभरण


भुसावळ- हतनूर धरणाची आवक कायम असल्याने विसर्ग देखील कायम आहे. उजव्या तट कालव्यात पूर्नभरण व सिंचनासाठी होणारा विसर्गही अद्याप सुरू असलातरी हतनूरचा पावसाळी हंगाम संपण्यात आल्याने आता 15 ऑक्टोंबरपासून हे पूर्नभरण बंद केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रशासनाने 30 सप्टेंबरपर्यंत धरणात तब्बल 70 दलघमी पाण्याचा विसर्ग केला असून पावसाळी हंगामात दररोज हतनूरमधून उजव्या तट कालव्यात 14.16 क्युमेक्स पाणी सोडले जात आहे. कालव्यातून सोडण्यात आलेले हतनूरचे पाणी यावल व चोपडा तालुक्यातील विविध आठ ठिकाणी असलेल्या नदी, नाल्यांवर पुर्नभरण करून सिंचन केले जात आहे. यंदा विभागासह हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हा विसर्ग वाढवून गेल्या काळातील घटलेली भुजलपातळी वाढविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. हतनूरच्या उजव्या तट कालव्याच्या पूर्नभरणामुळे काही प्रमाणात का होईना भुजलपातळी वाढून शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.


कॉपी करू नका.