भुसावळात भाजपातर्फे विद्यमान आमदार संजय सावकारेंनाच उमेदवारी
भाजपातर्फे पहिली यादी जाहीर : चाळीसगावात मंगेश चव्हाणांना उमेदवारी
भुसावळ- भाजपा-शिवसेनेची महायुती झाल्यानंतर जागा वाटपांबाबत चर्चेचे गुर्हाळ कायम असतानाच मंगळवारी भाजपाने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात भुसावळसह रावेरच्या विद्यमान उमेदवारांना संधी दिली आहे. भुसावळात भाजपातर्फे आमदार संजय सावकारे, रावेरात हरीभाऊ जावळे तसेच चाळीसगावात मंगेश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आल्याने समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
- खान्देशातून या उमेदवारांना भाजपाने दिली संधी
नंदुरबार- डॉ.विजयकुमार गावीत
नवापूर- भरत माणिकराव गावीत
धुळे ग्रामीण- ज्ञानज्योती मनोहर भदाणे-पाटील
शिंदखेडा- जयकुमार रावल
रावेर- आमदार हरीभाऊ जावळे
भुसावळ- आमदार संजय सावकारे
जळगाव- आमदार राजूमामा भोळे
अमळनेर- शिरीष चौधरी
चाळीसगाव- मंगेश रमेश चव्हाण
जामनेर- गिरीश महाजन
(अपडेट न्यूजसाठी बातमीची लिंक रीफ्रेश करा)

