मुलाचा खून करीत आईचीही आत्महत्या
नाशिक : मुलाचा उशीने तोंड दाबून खून केल्यानंतर आईनेदेखील गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडल्याने खळबळ उडाली. रीधान सागर पाठक असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे तर शिखा सागर पाठक (30, रा.साईसिद्धी अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) असे मयत आईचे नाव आहे. मुलगा रीधान अभ्यास करत नाही, म्हणूण त्याच्या नाकातोंडावर उशी दाबून त्याची हत्या करण्यात आली असावी व नंतर महिलेनेदेखील गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
आधी मुलाची केली ह त्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखा सागर पाठक (32) यांनी सोमवारी त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरुमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने तोंड दाबून खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मुलगा ऑनलाईन अभ्यास करत नसल्याने आईने त्याची हत्या केल्याचा संशय आहे. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली असून या नोटमध्ये माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये, असं मृतक महिलेने लिहिलं आहे.
