दिड लाखांच्या लाच मागणी प्रकरणी उपनिरीक्षकासह निलंबीत हवालदारा विरोधात गुन्हा
नवी मुंबई : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी साडेतीन लाखांची लाच मागत त्यातील एक लाख 40 हजार रुपये स्वीकारणार्या पोलीस उपनिरीक्षकासह निलंबीत हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एका व्यापार्याच्या मालाचा अपहार झाल्याचा गुन्हा एपीएमसी पोलीस ठाण्यात गतमहिन्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक पंकज महाजन यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी एका संशयित आरोपीचे नाव निष्पन्न केले होते. मात्र त्याची अटक टाळण्यासाठी हवालदार सुनील पवारमार्फत त्यांनी संशयीत आरोपीच्या मित्राला जबरदस्तीने मध्यस्थी केले होते. एक लाख 40 हजार रुपये स्विकारले होते मात्र उर्वरित रकमेसाठी त्यांच्याकडून दबाव वाढल्याने तक्रारदार याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती.
हवालदार यापूर्वीच निलंबीत
हवालदार सुनील पवारला निलंबित करण्यात आले होते. तर महाजन विरोधात यापूर्वीच एक तक्रार आल्याने त्यामध्ये त्यांची बदली इतर ठिकाणी करण्यात आली होती. दरम्यान प्राप्त तक्रारीच्या आधारे चौकशीत महाजन व पवार यांनी 1 लाख 40 हजार रुपयांची लाच घेतल्याचे स्पष्ट झाले. त्याद्वारे या दोघांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
