पैशांच्या वादातून अमळनेरात 35 वर्षीय तरुणाचा खून
अमळनेर : 35 वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या झाल्याची घटना शहरात शुक्रवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पैशाच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा असून या घटनेत प्रकाश दत्तू पाटील (35, रा. गांधलीपुरा, अमळनेर) या तरुणाचा मृत्यू झाला. शहरातील नगरपालिकेच्या हशमजी प्रेमजी व्यापारी संकुलात या तरुणाचा मृतदेह आढळला. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक राकेशसिंग परदेशी, हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर, नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, कैलास पांडुरंग शिंगाणे याने हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.

