भाजपा संघटन अधिक मजबुतीकरणावर द्यावा भर : आमदार संजय सावकारे
भुसावळ : संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जाती मोर्चा मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे व अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर व ग्रामीणची विस्तृत बैठक रविवार, 29 रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहावर आमदार संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी ते बोलत होते.
केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा : विकास अवसरमल
भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास अवसरमल यांनी भुसावळ शहर व ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष यांनी संघटनात्मक रचनेनुसार कार्यकारीणी पूर्ण करावी तसेच समर्थ बूथ अभियान आपल्या मंडळात व्यापक प्रमाणात राबवावे आणि केंद्र शासनाच्या ज्या अनुसूचित जातीसाठी योजना असतील त्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 21सप्टेंबर रोजी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार सुधाकर भालेराव यांचा नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.



यांची बैठकीला उपस्थिती
भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, अनुसूचित जाती मोर्चा उप जिल्हाध्यक्ष अमोल घोडे, जिल्हा सरचिटणीस सुबोध वाघमारे, अनंत नन्नवरे, भाजपा माजी शहराध्यक्ष व ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव सोयंके, भाजपा शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, भुसावळ ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप सुरवाडे, विलास भालेराव, प्रमोद गायकवाड, राजू निकम, योगेश जोहरे, मिलिंद कैसे, दीपक सोनवणे, अनुसूचित जाती मोर्चा शहर सरचिटणीस सुरेश जोहरे, अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष संतोष ठोकळ, उपाध्यक्ष विक्की गोहर, मुकेश कांबळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रशांत निकम यांनी तर आभार भुसावळ अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष राहुल वसंत तायडे यांनी मानले.

