माजी मंत्री महाजन म्हणाले ; आता सिडी दाखवाच


जळगाव : त्यांनी ईडी लावली की आम्ही सीडी लावू, असे विधान राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी अलीकडच्या काळात केल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली होती मात्र सीडीच्या विषयावरून राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आता ती सीडी लावावी, असे खुले आव्हान खडसे यांना दिले आहे. सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीनंतर गिरीश महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ईडी आणि सीडी वरून जळगाव जिल्ह्याचे राजकारण गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. त्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची इडीची चौकशी सुरु असून, सीडी केव्हा लागेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, सीडी बाबत काही जणांकडून अभ्यास व तपासणी सुरू आहे. ती तपासणी व अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी जाहिररित्या सीडी दाखवावी असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले आहे.

मंदिरे उघडली नाही तर आम्ही उघडू
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे आता अनेक निर्बंध शिथिल झाले आहेत. राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत, तसेच इतर राज्यांमध्ये देखील मंदिर उघडली गेली आहेत.मात्र राज्य शासनाकडून अजूनही मंदिरे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने सोमवारी भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने आता मंदिरे उघडली नाहीत तर आम्ही ती मंदिरे उघडू, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !