भीम आर्मीच्या आंदोलनाला यश : चुंचाळे फाटा रस्त्याची लवकरच होणार दुरुस्ती
यावल : चुंचाळे फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बुधवारी अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्यमार्गावर भीम आर्मीकडून रस्तारोको आंदोलन करण्यात आले. येत्या दहा दिवसात रस्त्याच्या दुरूस्तीला सुरूवात करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परीषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दहा दिवसात काम न सुरू झाल्यास भीम आर्मीकडून सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
रस्ता दुरुस्तीसाठी भीम आर्मीचे आंदोलन
अंकलेश्वर – बर्हाणपूर राज्यमार्गावर चुंचाळे फाटा आहे व तेथून चुंचाळे गावापर्यंत जाणारा तीन किमी अंतराचा रस्ता आहे. हा रस्ता प्रचंड मोठ्या प्रमाणावर खराब झाला असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार भीम आर्मी कडून सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले मात्र रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. अखेर बुधवारी भीम आर्मीच्या वतीने अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. जिल्हा परीषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र सुर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ यांनी भीम आर्मीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना येत्या दहा दिवसात रस्त्याच्या दुरूस्तीचे आश्वासन दिल्यानंत आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंतादेखील उपस्थित होते.



यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात भीम आर्मीचे राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे, राज्य सचिव सुपडू संदानशिव, जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, महा सचिव श्रीकांत वानखेडे, मुख्य संघटक विक्रम प्रधान, डॉली वानखेडे, योगेश भालेराव, तालुकाध्यक्ष हेमराज तायडे, उपाध्यक्ष आकाश तायडे, आकाश बिर्हाडे, गौरव सोनवणे, प्रशांत तायडे, सचिन वानखेडे, राजू वानखेडे, राहुल गजरे, शिवाजी गजरे, निखिल सावळे, प्रवीण सावळे, मिथुन गजरे, करण ठाकरे, भुसावळ तालुकाध्यक्ष विकास वळकर सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, सहा. फौजदार विजय पाचपोळे सह कर्मचार्यांनी बंदोबस्त ठेवला.

