माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई व वकील यांना सीबीआयने घेतले ताब्यात


मुंबई : माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोघांनाही ताब्यात घेताना सीबीआयने त्याचे कारण अथवा कोणतीच माहिती त्यांना दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करीत देशमुख यांची मुलगी, जावई आणि वकील हे वरळी येथील निवासस्थानातून बाहेर पडत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली. देशमुख यांचे जावई आणि वकील यांना 10 ते 12 जणांनी ताब्यात घेत वाहनात बसवले मात्र यावेळी कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नाही. एकंदरीत ही सगळी कारवाई बेकायदेशीर आहे. कोणत्याही नियम अथवा प्रक्रियेला धरून ही कारवाई नाही, असेही मलिक म्हणाले आहेत. देशात कायद्याचं राज्य आहे की या राज्यकर्त्यांचा नवा कायदा देशात लागू झाला आहे, याचा खुलासा सीबीआयने करावा, असेही मलिक म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !