माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले ; कोणत्याही दडपणाला बळी न पडता सामोरे जाणार !


मुक्ताईनगर : वेगवेगळ्या माध्यमातून आपली अडवणूक सुरू असून दडपण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र आपण कोणत्याही दडपणाला बळी न पडता आपण सामोरे जाणार असल्याचे सुतोवाच राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे गुरुवार, 2 रोजी येथे केले. मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर माध्यमांनी खडसे यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. गुरुवारी माजी मंत्री खडसे यांच्या वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी खडसे यांनी सांगितले की, आपण जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असून आपल्याकडे आज पद नसलेतरी आपल्यावर प्रेम करणार्‍यांची संख्या मोठी आहे.

मी आजही अत्यंत मजबूत
खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, मी झुकणार नाही.. वाकणार नाही.. मी ..मजबूत आहे.. कोणी कितीही छळ केला तरी मी घाबरणार नाही..असे स्फूर्तीदायक विधान कार्यकर्त्यांना उद्देशून केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !