माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडेंनी दिल्या शुभेच्छा


भुसावळ : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे यांचा गुरूवार, 2 सप्टेंबर रोजी वाढ दिवस असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वाणी, माजी नगरसेवक वासुदेव बोंडे, सुहास फालक, मनीष पाचपांडे आदींनीही माजी मंत्री खडसे यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.

दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव
माजी मंत्री खडसे यांच्यावर दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मुक्ताईनगर येथील फार्मवर दिवसभर हजारो कार्यकर्त्यांची यावेळी गर्दी झाली होती. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडीया व फोनद्वारे शुभेच्छा देत नाथाभाऊंवरील प्रेम व्यक्त केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !