जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले ; राष्ट्रवादी काँग्रेस माजी मंत्री खडसेंच्या पाठीशी


चाळीसगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संकट काळात आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा डाव मांडला जात आहे, कोणतीही चूक नसताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यातूनच एकनाथराव खडसे यांच्याविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील दिली. जयंत पाटील हे जिल्हा दौर्‍यावर असून चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पूरग्रस्त स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आले असता प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना प्रश्‍न विचारला असता ते बोलत होते.

खडसेंच्या जावयाचा जामीन फेटाळला
ईडीमुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भोवती चौकशीचा ससेमिरा सध्या सुरू आहे त्यामुळे खडसे यांचा परीवारदेखील अडचणीत आलेला आहे. त्यांचे जावई गिरीष चौधरी यांना अटक करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कस्टडीत आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात खडसे यांचे जावई चौधरी यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.




 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !