वरणगावात माजी मंत्री खडसेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


राष्ट्रवादीने केक कापून केले वृक्षारोपण

वरणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जळगांव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, व्हीजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, युवती जिल्हा उपाध्यक्ष शिवकन्या दीपिका भामरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य वाल्मीक यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून पक्ष कार्यालयात केक कापण्यात आला. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, जळगाव जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा प्रतिभा तावडे, भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, प्रथम माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, महिला आघाडी शहराध्यक्षा रंजना पाटील, माजी नगरसेविका जागृती बढे, वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी, ज्येष्ठ माजी नगरसेवक विष्णू खोले, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, माजी नगरसेवक रवी सोनवणे, माजी नगरसेवक साजीद कुरेशी, माजी नगरसेवक बबलू माळी, दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !