साकीनाका घटनेतील बलात्कार्‍यास कठोर शिक्षा : खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालणार : मुख्यमंत्री


.मुंबई : साकीनाका परीसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. या संदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशीदेखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशीदेखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणार्‍या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. या संदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !