आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डेंगू निर्मूलन सप्ताह
वरणगाव : शिवसेना वरणगाव शहरतर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डेंगू निर्मूलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून कीटकनाशकाची फवारणी व धुरळणी तसेच डेंगूबाबत जनजागृती केली जात आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याहस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाजसेवक तथा मुस्लिम समाजाचे नेते हिप्पीभाई यांच्या निवासस्थानापासून धुरळणीला सुरूवात करण्यात आली.
नागरीकांमध्ये जनजागृती
आयोजक शिवसेना परीवार वरणगाव शहर यांच्या वतीने संपूर्ण शहरात फवारणी तसेच धुरळणी व डेंग्यू तसेच इतर साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, समाजसेवक हिप्पीभाई शिक्षक सेनेचे अल्पसंख्यांकचे राज्य अध्यक्ष इलियास, रावेर लोकसभा शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, दर्यापूरचे माजी सरपंच सुनील कोळी, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश चौधरी, अल्पसंख्यांकचे उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी, उपशहरप्रमुख सुखदेव धनगर, निलेश ठाकूर, अतुल पाटील, दीपक पाटील, राहुल बावणे, संतोष माळी, राम शेटे, आबा सोनार, अबू सुफियान मुदस्सर खान, अजीम खान जहीर खान, अरबाज पैलवान, उमेर शेख, मंजूर पठाण, समीर शेख, सय्यद मोबीन, सद्दाम मुल्ला जी, फैजुल शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




