जळगावकर हादरले : सलग दुसर्‍या दिवशी खून


जळगाव : आईच्या चारीत्र्यावर वडिल संशय घेत असल्याने दोघा मुलांनीच पित्याची हत्या केल्याची घटना शहरातील निमखेडी रोड परीसरात सोमवारी घडली होती. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच शहरात पुन्हा एकाचा खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रथ चौकाला लागून असणार्‍या आंबेडकर नगराच्या बाजूच्या परीसरातील राजू पंडित सोनवणे (55) या व्यक्तीची डोके ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान लागोपाठ दुसर्‍या दिवशी शहरात खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली.

पाच लाखांचे खंडणी प्रकरण : अजय गोडाले जाळ्यात 




सलग दुसर्‍या दिवशी खुनामुळे खळबळ
जुना जळगाव परीसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवनासमोरील रहिवासी राजू पंडित सोनवणे (55) यांची डोके ठेचून हत्या करण्यात आल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. मयत राजू सोनवणे व्यवसायाने रीक्षस चालक होते परंतु गेल्या काही दिवसांपासून ते घरीच असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी 8.30 वाजले तरी राजू सोनवणे खाली न आल्याने त्यांनी वर जावून पाहिले असता हा प्रकार लक्षात आला. राजू सोनवणे यांचे डोकं ठेचून हत्त्या करण्यात आली असून घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !