गोरगरीबांची सेवा हेच ध्येय : माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी


भुसावळ : प्रहार संघटनेची बैठक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत प्रहार युवक कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. प्रसंगी प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, भुसावळ शहरात अनेक प्रश्न आहेत. पक्षात नव्याने आलेल्या सहकार्‍यांच्या मदतीने आता ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गोरगरीबांच्या सेवेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येईल, लोकांची सेवा हा आपला पाया असून तो अधिक मजबूत झाला तरच प्रहार मजबूत होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्ता हाच पक्षाचा मजबूत पाया : अविनाश पाटील
युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी विचार मांडतांना म्हणाले की, पक्ष संघटना वाढवण्यासाठी जोमाने कार्यकर्त्यांनी काम करावे शिवाय कार्यकर्ता हाच पक्षाचा मजबूत पाया असून सामान्यातील असामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून, मार्गदर्शनातून प्रयत्न करावेत, असे आवाहनही पाटील यांनी केले.




प्रहारची युवक कार्यकारीणी जाहीर
प्रसंगी प्रहारची युवक कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. प्रहार भुसावळ युवक शहराध्यक्ष सनी गोणे, भुसावळ कामगार तालुकाध्यक्ष उज्वल पटेल, भुसावळ युवक उपाध्यक्ष धीरज मराठे, भुसावळ युवक उपाध्यक्ष राकेश अहिरे, युवक भुसावळ शहर प्रसिद्धी प्रमुख भूषण जेठवे, भुसावळ शहर संघटक शेरा विसपुते, भुसावळ शहर सरचिटणीस चेतन पवार, भुसावळ युवक कोषाध्यक्ष अमित कापसे, भुसावळ शहर चिटणीस प्रवीण खडसे यांची निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रहार युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संजय आवटे, भुसावळ युवक तालुकाध्यक्ष अक्षय पाटील, गब्बर चावरीया व सर्व नवनिवार्चित पदाधिकारी प्रहार सेवक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !