अजितदादा पवार म्हणाले ; पक्षात अनेक येतात अन् जातात, पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही


भुसावळ : जळगावात पेपरबाजी मोठ्या प्रमाणावर सुरू असून हा घरातला प्रश्‍न असून राजीनामा देणे, पक्षाला वेठीस धरणे चुकीचे असून पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही, अगदी मीदेखील नाही, अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमवारी जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहावर भाष्य केले. भुसावळात आयोजित विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी ऑनलाईन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

पक्षाला वेठीस धरू नका : अजित पवार
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. काही दिवसांपूर्वी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आल्याने त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांचे समर्थक असणार्‍या पक्षाच्या 12 फ्रंटलच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी देखील तातडीने आपल्या पदांचे राजीनामे दिलेत. खुद्द अभिषेक पाटील यांनी आपल्या समर्थकांना आवाहन करून राजीनाम्याद्वारे पक्षाला वेठीस न धरण्याचे आवाहन केले मात्र सोशल मीडियातून अभिषेक पाटील आणि त्यांच्या विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावर भाष्य केले. उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका परीारासारखा आहे. यामुळे कुणाला पदे मिळाली नाहीत म्हणून नाराज होण्याची गरज नाही. राजीनामा देऊन पक्षाला वेठीस धरणे चुकीचे आहे. पक्ष कुणासाठी थांबत नसतो. पक्षापेक्षा कुणी मोठा नसतो. आज अजित पवार मुख्यमंत्री असले तरी ते पक्षामुळे उपमुख्यमंत्री असल्याची जाणीव सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. ज्यांना कुणाला पदे मिळतात, त्यांनी त्या पदाची जबाबदारी देखील लक्षात घेतली पाहिजे. पक्ष कुणासाठी थांबत नाही. लोक येतात, जातात पक्ष पुढे जात असतो. दुसरी मंडळी त्यांची जबाबदारी घेत असते अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा नाट्यावर भाष्य केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !