नंदुबार गुन्हे शाखेची धडक कारवाई : म्हसावदमधील बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त ; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट दारू पोलिसांच्या ऐरणीवर  एका आरोपीला यंत्रणेकडून अटक


Bold action by Nandurbar Crime Branch: Spurious country-made liquor unit in Mhasavad busted ; contraband worth ₹10 lakh seized. नंदुरबार (20 जून 2026) : नंदुरबार जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुगलबारी पाडा येथे सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल 10 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नंदुरबार गुन्हे शाखेला बनावट दारूची माहिती मिळते मात्र स्थानिक यंत्रणा करते तरी काय? असा प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील बनावट दारू आता पोलिसांच्या ऐरणीवर असून या पद्धत्तीनेच आता कारवाया होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोपनीय माहितीवरून कारवाई 
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बनावट दारू कारखान्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने 17 जून रोजी म्हसावद ठाणे हद्दीतील जुगनी गावातील दुगलीबारी पाड्यातील धाव घेतली. एका घरा बनावट दारू तयार केली जात असताना असतानाच पथकाने छापा टाकला. घटनास्थळी एका कोलार घरात स्पिरिटच्या सहाय्याने बनावट देशी दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपी लक्ष्मण हत्या पावरी (31, रा.तलावाडी, धनाजे बु.॥, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याला अटक करण्यात आली.




10 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी छाप्यामध्ये 39 बॉक्स बनावट देशी दारू, 150 लिटर स्पिरिट, दारू पॅकिंगसाठी वापरले जाणारे इलेक्ट्रिक मशीन, विविध साहित्य तसेच सात लाख रुपये किंमतीचे बोलेरो वाहन (एम.एच.39 जे.0944) असा एकूण दहा लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, मुकेश तायडे, सुनील येवले, दिनेश चित्ते, विशाल नागरे, जितेंद्र पाडवी, पुरुषोत्तम सोनार, चेतन साळवे, विनोद पाटील, मनोज महाजन, अभय राजपूत आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !