ऐनपूरच्या लसीकरण केंद्राला खासदार रक्षा खडसेंची भेट
ऐनपूर : खासदार रक्षा खडसे यांनी 12 सप्टेंबर रोजी ऐनपूर येथील लसीकरण केंद्राला भेट देत आढावा घेतला. या भागात नागरिकांचा लसीकरणास प्रतिसाद मिळावा, यासाठी अष्टविनायक गणेश मंडळाने मेहनत घेतली. भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रावेर भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, जितेंद्र पाटील, अंकुश चौधरी, शुभम पाटील, प्रमोद चौधरी, हरलाल कोळी, कमलेश महाजन, संदेश महाजन, पंकज पाटील, जयराम कोळी, शिवम महाजन उपस्थित होते.

