धक्कादायक ! नराधम पित्याचा सात वर्षांपासून मुलीवर अत्याचार
पुणे : नराधम पित्याने आपल्यात 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध होत आहे. तब्बल सात वर्षांपासून पीडीत मुलीवर पित्याने अत्याचार केले. ऑनलाईन ट्यूशन घेणार्या शिक्षिकेला पीडीतेला घडला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर नराधम पित्याला अटक करण्यात आली. कोंढवा पोलिसांनी या किराणा दुकानदार वडिलांना अटक केली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी सांगितले की, या मुलीच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. तो गेली 7 वर्षे आपल्याच मुलीवर अत्याचार करीत होता. सध्या शाळा बंद असल्याने मुलगी घरीच असते. आपल्यावरील हा अत्याचार ही मुलगी असह्यपणे सहन करत होती. शेवटी तिने आपल्या ऑनलाईन शिकविणार्या शाळेच्या शिक्षिकेला आप बिती कहानी सांगितली. त्यांनी याकडे गंभीरपणे पहात थेट कोंढवा पोलीस ठाणे गाठले. कोंढवा पोलिसांनी तातडीने या शिक्षिकेची फिर्याद घेतली. त्यावरुन पोलिसांनी 376 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन मुलीच्या वडिलांना अटक केली.

