सहा जिल्ह्यातील निवडणुका पुढे ढकलण्यासाठी रावेरात भाजपाची निदर्शने


रावेर : ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असतांना सहा जिल्ह्यात असलेल्या निवडणुका पुढे घेण्यासाठी रावेर तहसील कार्यालयात निर्दशने करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सी.जी.पवार यांना देण्यात आले.

निवडणुका पुढे ढकण्याची भाजपाची मागणी
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असतांना सहा जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चातर्फे तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सभापती कविता कोळी, पंचायत समिती सदस्य जितु पाटील, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, श्रीकांत महाजन, सी.एच.पाटील, अतुल महाजन, सुनील पाटील, शुभम पाटील, विनोद पाटील, प्रा.सजंय मोरे, हरलाल कोळी, मनोक श्रावग, पी.के.महाजन आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.




धक्कादायक ! नराधम पित्याचा सात वर्षांपासून मुलीवर अत्याचार 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !