जाहीर माफी मागा अन्यथा मोठा त्रास होईल ; दरेकरांना सुरेखा पुणेकरांचा इशारा


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी विधान परीषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यांच्या या विधानानंतर राजकारण पहायला मिळत आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी देखील प्रवीण दरेकर यांना इशारा दिला आहे. 16 सप्टेंबरला सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. दरम्यान, सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. ए.बी.पी. माझासोबत बोलतांना सुरेखा पुणेकर म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकर फार चुकीचं बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करु नका. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना खूप त्रास होईल सगळ्या पक्षांमध्ये लोककलावंत आहेत. माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे का बोलले ?. दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील स्त्रियांना खूप वाईट वाटलं. माझ्यासारखी महिला एवढ्या कष्टाने जर घडत असेल मात्र आज दरेकरांसारखे विरोधी पक्षनेते असे विधान करतात, हे चुकीचे आहे. भा.ज.पा. सारख्या पक्षात प्रवीण दरेकर सारखे नेत्यांचा काही उपयोग नाही, असेही सुरेखा पुणेकर म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !