कंडारीत डेंग्यू, मलेरीयाचे रुग्ण वाढले : उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन


भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे डेंग्यूसह मलेरीयाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने तातडीने दोषींवर कारवाई करावी, गावासाठी तातडीने कायमस्वरुपी ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, नागसेन कॉलनीतील अंगणवाडीला घाणीच्या विळख्यातून बाहेर काढावे आदी मागण्यांबाबत गटविकास अधिकारी विलास भाटकर यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांची दखल न घेतल्यास आरपीआय आठवले गटातर्फे लोकाशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्‍वास सोमाजी खरात, जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू सुरडकर, जिल्हा उपाध्यक्ष शरद सोनवणे, तालुकाध्यक्ष दिलीप मोरे, प्रसिद्धीप्रमुख भगवान निरभवणे, सुनील ढिवरे, सुनील रायमळे, महेंद्र भोसले, गौतम तायडे, प्रशांत घुसळे, विजय मोरे, सिद्धार्थ मोरे आदींची नावे आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !