खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत अनेक तरुणांचा भाजपात प्रवेश


मुक्ताईनगर : रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगावे, पंचाणे येथील युवकांनी शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दिवसाचे औचित्य साधत भाजपात प्रवेश केला. भारतीय जनता युवा मोर्चात कार्यरत होऊन पक्षाचे विचार तळागाळात पोहोचणार असल्याचा मनोदय प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

या पदाधिकार्‍यांची निवड
प्रसंगी भाजयुमो कार्यकारीणीच्या तालुका सरचिटणीसपदी हर्षद (मयुर) कृष्णा महाजन व उमेश रमेश भिंगरे तर भाजयुमोच्या तालुका सोशल मीडिया संयोजकपदी कल्पेश रामदास पाटील व भाजयुमोच्या तालुका कोषध्यक्षपदी आकाश संतोष ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी खासदार रक्षाखडसे यांच्यासह भाजपा मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जावरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, हर्षद (मयुर) कृष्णा महाजन, उमेश रमेश भिंगरे, कल्पेश रामदास पाटील, आकाश संतोष ठाकरे, संजय जानकीराम ठाकरे, बबलू पाटील, योगेश तायडे, जितेंद्र ठाकरे, कुंदन ठाकरे, मयुर ठाकरे, पवन ठाकरे, आकाश संतोष ठाकरे, ज्ञानेश्वर काशीनाथ ठाकरे, उमेश रमेश भिंगरे, कुणाल तुकाराम तायडे, यशराज रामभाऊ पाटील, सुरज युवराज पाटील, पवन ज्ञानेश्वर पाटील, प्रतिक मुरलिधर कोळी, गजानन राजेंद्र पाटील, पवन सुकलाल ठाकूर, अमोल ठाकरे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !