पालकमंत्री गुलाबराव पाटील ओबीसी परीषदेला लावणार हजेरी


जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 11.30 वाजता सी.एस.एम.टी. मुंबई रेल्वे स्टेशन येथे आगमन व अमृतसर एक्सप्रेसने जळगाव कडे प्रयाण. शनिवार, 25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 6.20 वाजता जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व पाळधी, ता.धरणगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण., सकाळी 6.50 वाजता पाळधी, ता.धरणगाव येथे आगमन व राखीव, सकाळी 10.30 वाजता पाळधी, ता.धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता जळगाव येथे आगमन व ओबीसी परीषद कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- राजे संभाजी नाट्यगृह, जळगाव. सोईनुसार पाळधी, ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव, दुपारी 3.45 वाजता पाळधी, ता.धरणगाव येथून जळगावकडे प्रयाण, दुपारी 4.15 वाजता दैनिक दिव्य भास्कर आयोजित फन्टास्टिक फार्मर्स अवॉर्ड कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- हॉटेल प्रेसिडेन्ट कॉटेज, जळगाव. सोईनुसार पाळधी, ता.धरणगावकडे प्रयाण व राखीव.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !