भुजबळ म्हणाले ; कारागृहात प्रकृती खालावल्यानंतर आमदार कपिल पाटील यांच्यामुळे वाचला जीव


जळगाव : तुरूंगात असताना प्रकृती खालावल्यानंतर आमदार कपिल पाटील यांच्यामुळे त्यावेळी आपला जीव वाचला, अशी भावना मंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली. जळगावात शनिवारी झालेल्या ओबीसी परीषदेत त्यांनी हा जुना किस्सा उपस्थितांना सांगितला.

कपिल पाटील यांच्यामुळे वाचला जीव
छगन भुजबळ यांनी तुरुंगात असताना आमदार कपिल पाटील यांनी आपला जीव कसा वाचवला, याविषयी आठवण सांगितली. जेलमध्ये जेव्हा मला टाकलं तेव्हा एकदा फार गंभीर प्रकृती झाली होती. तिथे सोपी गोष्ट असते. कुणाला तरी जेलमध्ये टाकायचं. तो आजारी पडला की त्याच्याकडे बघायचं नाही आणि एक दिवस गेल्यावर म्हणायचं की हार्ट अटॅकने गेला, संपला विषय. पण जेव्हा कळलं की भुजबळ एकदम सीरियस आहेत, तेव्हा हे आमदार कपिल पाटील विधान मंडळात उभे राहिले. म्हणाले, तुम्ही काय वागणूक देत आहात त्यांना? हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत, नीट काळजी घेत नाहीत. तिथे मारून टाकणार की काय तुम्ही ? नंतर शरद पवारांनी पत्रच पाठवलं की, भुजबळांना काही झालं तर हे सरकार जबाबदार राहील. सुदैवाने मी बाहेर आलो, असं भुजबळ म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !