संतापजनक : कोरोनाऐवजी दिली रॅबीजची लस


ठाणे : कोरोना लसऐवजी रेबीज लस दिली गेल्याचा धक्कादायक प्रकार कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकारानंतर मंगळवारी दुपारी महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकार्‍यांची बैठक घेऊन, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेच्या वतीने येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नागरीकाला कोरोनाऐवजी रेबीज लस दिली
कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागातील महापालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीला कोरोना लसीऐवजी रेबीजची लस देण्यात आली. या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांना माहिती होताच, त्यांनी मंगळवारी या संदर्भात आपल्या दालनात पालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांची कान उघाडणी केली. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. ज्या व्यक्तीला रेबीजची लस देण्यात आली आहे. त्याची प्रकृती उत्तम असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.




 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !