डोंगरी नदीत वाहिलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह आढळला
चाळीसगाव : तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील 25 वर्षीय तरूण शेतात जात असतांना डोंगरी नदीत वाहून गेल्याची घटना बुधवारी सकाळी उघड झाली होती. बत्तीशा शिवारात तरूणाचा मृतदेह आढळला आहे. सोमनाथ रामजी राठोड (25) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरूण बुधवारी सकाळी सुमारास शेतात गेला असताना गावालगत असलेल्या डोंगरी नदीच्या पात्रात वाहून गेला होता. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
अखेर मृतदेह लागला हाती
तरुण वाहून गेल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह ओमकार सुतार, भगवान माळी, पी.एन.ठाकूर, भगवान पाटील आदी पोलीस कर्मचार्यांच्या पथकाने पथकाने शोध कार्य सुरू केले असता तालुक्यातील बत्तीशा गावाच्या शिवाराजवळ मयत सोमनाथ राठोडचा मृतदेह आढळून आला. याप्र करणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.








