गौरव भोळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार


जळगाव : राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव व श्री राजपूत करणी सेना यांच्यातर्फे मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण नुकतेच झाले. भुसावळ तालुक्यातील खडका येथील रहिवासी व जळगावच्या काशीबाई उखाजी कोल्हे शाळेतील शिक्षक तसेच महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष गौरव भोळे यांनाही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. भोळे यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. भोळे यांना या अगोदर सुद्धा अनेक पुरस्कारांनी विविध सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच श्रेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !