29 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव : शहरातील आंबेडकरनगरात राहणार्या 29 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लक्ष्मी सचिन सैंदाणे (29) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
जळगाव शहरातील आंबेडकर नगरातील रहिवासी लक्ष्मी सचिन सैंदाणे (29) या विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीला आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. वैद्यकीय अधिकारी डॉ.नम्रता अच्छा यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास प्रकाश पाटील हे करीत आहेत.

