विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा
वरणगाव : विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तळवेल, ता.भुसावळ गावातील रहिवासी महिलेचा मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी श्रीकृष्ण गोकुळ राणे याने घरात प्रवेश करून विनयभंग केल्याचा आरोप आहे. बुधवारी वरणगाव पोलिसात विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस उपनिरीक्षक आशिष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव करत आहेत.
