मोठी बातमी : क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अखेर जामीन मंजूर


मुंबई : क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेतील आरोपी आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्यन खानची दिवाळी आता मन्नतवर साजरी होणार आहे.

न्यायमूर्ती सांब्रे यांच्या न्यायासनापुढे सुनावणी
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उर्वरित सुनावणी बुधवारी झाली होती. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता तर बुधवारी अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युक्तीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी गुरुवारी सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला.



आर्यनकडून ड्रग्जचे नियमित सेवन : एनसीबी
अनिल सिंग म्हणाले की, आर्यन खान ड्रग्जचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसर्‍याला ड्रग्ज असल्याचं माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले. दरम्यान, आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाल्याने निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं मुकूल रोहतगी यांनी सांगितलं. साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असे वकिलांनी सांगितले मात्र जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी सांगितलं.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !