परसाडे शिवारात प्रौढाची आत्महत्या
यावल : तालुक्यातील परसाडे शिवारात 50 वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भावलाल फुलसिंग जाधव-बेलदार (रा.परसाडे) असे मृताचे नाव आहे. गेलया तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. मंगळवारी कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा कुजलेला मृतदेह आढळला. या प्रकरणी मृताचा भाऊ रमेश जाधव-बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगळवारी कोळदेव महाजन (रा.कोळवद) यांच्या परसाडे शिवारातील शेतात मृतदेह आढळला.


