भुसावळातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमित नागरीकांना हक्काचे घरकुल द्या

भुसावळ पालिका प्रशासनाला जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांचे निवेदन


भुसावळ : भुसावळ रेल्वे हद्दीतील सुमारे चार हजार नागरीकांचे अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने हटवल्याने नागरीक बेघर झाले आहेत. या नागरीकांना अद्यापही हक्काचे घरकुल मिळाले नसल्याने डिसेंबर 2022 पर्यत विस्थापीतांना पालिकेने राहुल नगराजवळील सर्व्हे नंबर 63/1 (19 हेक्टर) जागेवर पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधून द्यावे, अशी मागणी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (डेमोक्रॅटीक) (डी) या पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांनी गुरूवारी मुख्याधिकारी यांच्याकडे केली.

तीन वर्षांनंतरही नागरीक घरकुलाविना
पालिकेच्या हद्दितील रेल्वेच्या उत्तर वॉर्डात तीन ते चार हजार घरांचे अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने 16 ते 18 नोव्हेबंर 2018 या काळात विशेष मोहिम राबवून काढले. 15 नोव्हेंबर रोजी या बाबीला तीन वर्ष पूर्ण होत आले मात्र अद्यापही अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकुल मिळालेले नाही. प्रत्येक कुटुंबाला 500 स्केअर फुटाचे घर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधून द्यावी व सातबारा उतारा त्यांच्या नावावर करावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांनी केली. शासनाने याकडे लक्ष देऊन घरकुल योजनेत घरे तयार करून द्यावी, अशी मागणी साळवे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पालिका प्रशासनाकडे केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !