चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना पीकविम्याची रक्कम द्यावी

मुक्ताईनगर तहसीलदारांना मनसेचे निवेदन


मुक्ताईनगर : तालुक्यात चक्रीवादळामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने केळी उत्पादक संकटात सापडले आहेत. केळी उत्पादकांनी विमा काढल्यानंतर त्यांना तातडीने भरपाई मिळणे अपेक्षीत असताना ती मिळाली नसल्याने भरपाई देण्यासंदर्भात मनसे संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे, विधानसभा अध्यक्ष अतुल जावरे, तालुकाध्यक्ष मधुकर भोई, श्रीराम भोई, मंगेश कोळी, अतुल कोळी, दिनेश बाविस्कर, सुरेश बोडखे, सुनील कोळी, निलेश सापधारे, दीपक दुट्टे, मुकेश झा, गोपाळ वाघ, गोपाळ कोळी, हेमंत गुलगे आदी मनसे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !