कायद्यासह सामाजिक भान ठेवून वृत्तांकन करावे : पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे


भुसावळ : पत्रकारीता करताना घटनेची सत्यता जाणून द्यावी तसेच पत्रकारांनी अभ्यासपूर्वक कायदा समजून व सामाजिक भान ठेवून वृत्तांकन करावे. ज्यामुळे नक्कीच समाज मनावर चांगला परीणाम होऊन चांगला घटक व ओघाने चांगली समाज निर्मती होईल, असा आशावाद शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांनी येथे व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधी सेवा समितीतर्फे पॅन इंडिया अवरनेस अ‍ॅण्ड आऊटरीच हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्या अनुषंगाने भुसावळ पत्रकार संघ व महिला दक्षता समिती यांचा संयुक्तरीत्या भुसावळ पंचायत समिती येथील सभागृहात कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी, पत्रकार संजयसिंग चव्हाण, भुसावळ वकील संघ अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील, अ‍ॅड.वैशाली चौधरी, अ‍ॅड.जास्वंदी भंडारी, भुसावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी उपस्थित होतेे.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी आजची पत्रकारीता तसेच त्या संदर्भातील कायदे व मार्गदर्शक तत्वे या विषयावर अ‍ॅड.तुषार पाटील यांनी मार्गदर्शन केले तर दक्षता समिती सभासदांना काम करतांना कोणत्या अडचणी कायद्याचा अधिक संबंध येतो त्या संदर्भात अ‍ॅड.वैशाली चौधरी यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी, पत्रकार संजयसिंग चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भुसावळ वकील संघ महिला प्रतिनिधी अ‍ॅड.जास्वंदी भंडारी यांनी तर आभार पत्रकार संघ अध्यक्ष प्रेम परदेशी यांनी मानले. कार्यक्रमास भारती रंधे-म्हस्के, पत्रकार उज्वला बागुल, निरंजना तायडे, अंजुम खान, सुनंदा खरे, हबीब चव्हाण, सुनील आराक, कलीम पायलट, संजीव काशीव, राजेश तायडे, अ‍ॅड.निलेश भंडारी यांच्यासह विधी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिमा अग्रवाल, सुजाता वाघुळदे, नेहा जावरे आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !