त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने भुसावळात पोलिसांचे पथसंचलन
अफवांवर विश्वास ठेवू नका : डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे
भुसावळ ः त्रिपुरासह अमरावती येथे घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी शहरातील विविध भागातून पोलिसांनी रूटमार्च काढला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी नागरीकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले तसेच सोशल मिडीयावर तेढ निर्माण करणार्यांची माहिती देण्याचे आवाहनही केले.
दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक
मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रजा टॉवर चौकात पोलिसांचे दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यानंतर डीवायएसपी वाघचौरे यांनी नागरीकांसोबत चर्चा केली. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. समाजात अशांतता निर्माण करणार्यांवर नजर असल्याचे सांगितले. त्यानंतर शहरात रूटमार्चला सुरूवात होऊन जाम मोहल्ला, अमरदिप चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मॉर्डन रोड, गांधी चौक, जामा मशीद, अप्सरा चौक, वाल्मीक नगर चौक, पांडुरंग टॉकीज, दगडी पूल, गवळी वाडा, जळगाव नाका, तहसील कार्यालय, गुरूद्वारा येथे भेट देण्यात आली. तेथून गांधी पुतळ्याजवळ रूटमार्चचे विसर्जन झाले. सर्व पोलिस अधिकारी सहभागी होते.


