तु धरणातील मासे चोरी का करतो ? म्हणत तरूणाला मारहाण : तिघांविरोधात गुन्हा


पारोळा : तालुक्यातील करमाड येथे धरणातील मासे चोरीच्या कारणावरून तरूणाला तीन जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलिसात गुन्हा दाखल
तालुक्यातील करमाड येथील धरणाजवळ ठानसिंग मोहन भील (40, रा.करमाड, ता.पारोळा) हा कामाच्या निमित्ताने मंगळवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता करमाड धरणावर गेला. त्यावेळी तु धरणातील मासे चोरी का करतो ? असे सांगून नाना तारसिंग भील, गुलाब नामदेव पाटील, बापु रामचंद भील (सर्व रा. करमाड खुर्द, ता.पारोळा) यांनी लाकडी काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी ठाणसिंग भिल यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय भोई करीत आहे.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !