पैसे न आणल्याने विवाहितेला मारहाण करीत छळ : पतीस पाच जणांविरोधात गुन्हा


जळगाव : शहरातील रीधुरवाडा येथील विवाहितेचा माहेरून पैसे न आणल्याने शारीरीक व मानसिक छळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल
रीधुरवाडा येथील शीतल उमेश बाविस्कर यांचा उमेश बाविस्कर यांच्याशी विवाह झाला. विवाहनंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर पती उमेश याच्यासह सासरच्या मंडळींनी शीतल हिस माहेरुन पैसे आणण्याची मागणी केली. यावरुन पती उमेश याने शीतल हिस मारहाण केली तर इतरांनी वेळावेळी शिवीगाळ करत घरातून निघून जा तसेच घटस्फोट देण्याची धमकी देत शारीरीक व मानसिक छळ केला. 25 एप्रिल 2021 ते 17 नोव्हेंबर 2021 दरम्यान होणारा छळ असह्य झाल्यानंतर शीतल बाविस्कर या माहेरी निघून आल्या व छळाबाबत शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शिलतचे पती उमेश भागवत बाविस्कर, सासरे भागवत दामू बाविस्कर, नणंद रुपाली भागवत बाविस्कर, मावस नणंद वैशाली संजय कोळी, मोठी नणंद दिपाली विकास सोनवणे (रा.रीधुरवाडा, जळगाव) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रीकर हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !