संत रोहिदास विकास फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी वंदना वाघ


चाळीसगाव : संत रोहिदास विकास फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी चाळीसगाव येथील रहिवासी वंदना रावसाहेब वाघ यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या निवडीनंतर त्यांच्यावर समस्त रोहिदास समाजाच्यावतीने शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. समाजातील महिलांच्या समस्या व हक्कासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, महिला विकासासाठीविविध योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. वंदना वाघ यांची नियुक्ती संत रोहिदास विकास फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखा दिघे यांच्या आदेशाने करण्यात आली. या नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कार सुनीता चव्हाण, सीमा मोरे, मनीषा रुळे, उषा अहिरे, भारती मोरे यांनी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !