भुसावळ हत्याकांड : सागरची टीप देणारा चौथा संशयीतही जाळ्यात


जळगाव : भुसावळातील नगरसेवक रवींद्र खरात यांचा मुलगा सागर घरातून बाहेर पडल्याची टीप संशयीत आरोपींना देणार्‍या चौथ्या आरोपीच्याही मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आकाश सुकदेव सोनवणे (19) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. रविवारी घडलेल्या हत्याकांडापूर्वी आरोपी आकाश हा मृत सागर खरात याच्यावर पाळत ठेवून होतो शिवाय सायंकाळी दुचाकीवरून लाल चर्चकडे येत असल्याची माहिती कळताच आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सागरवर होणार होती एमपीडीएची कारवाई
मृत सागर खरात याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने त्यानुसार त्याच्यावर एमपीडीएची कारवाई प्रस्तावित होती. घटनेपूर्वी त्याला नोटीस देवून 10 ऑक्टोबरला हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच 6 रोजी त्याचा खून झाल्याचीही माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दिली.

भुसावळ हत्याकांडात पाच जणांचा बळी
भुसावळ शहरात 6 रोजी रात्री गोळीबार व प्राणघातक हल्ल्यात भुसावळातील भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात, भाऊ सुनील, मुलगा सागर, रोहित व सुमित गजरे या पाचही जणांचा मृत्यू झाला होता. हत्याकांडानंतर मारेकरी मोहसीन अजगर खान उर्फ बॉक्सर, मयुरेश रमेश सुरवाडे व शेखर हिरालाल मोघे उर्फ राजा बॉक्सर हे तिघे पोलिसांना शरण आले होते. ते तिघेही अटकेत असून पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्याकडून केलेल्या चौकशीत आणखी एकाचे नाव समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी घटनेतील चार क्रमाकांचा संशयीत आकाश सोनवणे याला अटक केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !