चाळीसगाव शहरातून पशूधनाची चोरी
चाळीसगाव : शहरातील हनुमानवाडी येथे घराजवळच्या शेडमध्ये बांधलेल्या 20 हजार रुपये किंमतीची जर्शी गाय अज्ञाताने लांबविली. या प्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हनुमानवाडी भागातून गायीची चोरी
शहरातील हनुमानवाडी येथील अर्जून निंबा गवळी (वय-49) यांनी घराजवळच्या शेडमध्ये बांधलेली 20 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची जर्शी वाणाची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी रात्री 9 ते 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वाजता या दरम्यान घडली. अर्जून निंबा गवळी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास किशोर सोनवणे हे करीत आहेत.

