राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : दोघे जागीच ठार
चाळीसगाव : राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव – कन्नड रोडवरील एका हॉटेलजवळ झालेल्या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी, 21 रोजी उघडकीला आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अपघातात दोघे ठार
याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१२- वरील चाळीसगाव-कन्नड रोडवरील सदिच्छा हॉटेलजवळ झालेल्या भिषण अपघातात हर्षल संतोष ठाकरे (२८, रा.सांगवी, ता. चाळीसगाव) व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल सहा (२२, रा. धनसनी भांदलगाव, राज्य उत्तराखंड) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार, २१ नोव्हेंबर रोजी ७.४५ वाजेच्या पूर्वी उघडकीला आली आहे. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचणामे केले. दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हर्षल संतोष ठाकरे हा हॉटेलवर कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु या घटनेने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहेत. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

