साकळीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीला अटक
यावल : तालुक्यातील साकळी येथील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपींनी शेतात विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
शेतात बालिकेचा विनयभंग
अल्पवयीन बालिकेचा विनयभंग तालुक्यातील साकळी येथील रहिवासी व मुळ मध्य प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी मजूर कुटुंबियातील बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी सखाराम उर्फ अक्रम मानसिंग भिलाला (रा. वराडसीम, ता. भुसावळ) यास अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.


